Jump to content

२०१८ राष्ट्रकुल खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
XXI राष्ट्रकुल खेळ
यजमान शहर गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया
सहभागी देश ७१ राष्ट्रकुल संघ
स्पर्धा १९ खेळ, २७५ स्पर्धा
स्वागत समारोह ४ एप्रिल
सांगता समारोह ४ एप्रिल
मुख्य मैदान कॅरारा स्टेडियम
२०१४ २०२२  >
संकेतस्थळ gc2018.com

२०१८ राष्ट्रकुल खेळ (XXI Commonwealth Games) ही राष्ट्रकुल खेळ स्पर्धांची एकविसावी आवृत्ती ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलंड राज्यामधील गोल्ड कोस्ट ह्या शहरामध्ये ४ एप्रिल ते १५ एप्रिल, २०१८ दरम्यान आयोजीत केली जात आहे. नोव्हेंबर २०११ मध्ये सेंट किट्स आणि नेव्हिस देशाच्या बासेतेर शहरामध्ये झालेल्या बैठकीत ह्या स्पर्धेचे यजमानपद गोल्ड कोस्टला देण्यात आले. ऑस्ट्रेलिया देशात राष्ट्रकुल खेळांचे आयोजन पाचव्यांदा होत आहे. यजमानपद मिळण्याच्या वेळेसच ब्रिस्बेनचे जुळे शहर असलेल्या गोल्ड कोस्टमध्ये ८० टक्क्यांहून अधिक क्रीडा संकुले अस्तित्वात होती ज्यामुळे आयोजन खर्च कमी झाला.

सहभागी देश

[संपादन]

मालदीव वगळता इतर सर्व ७१ राष्ट्रकुल परिषदेमधील सदस्य देश ह्या स्पर्धांमध्ये सहभाग घेत आहेत.

सहभागी देश जगाच्या नकाशावर
सहभागी देश (कंसात खेळाडूंची संख्या)

२०१४ राष्ट्रकुल खेळांप्रमाणे ह्या स्पर्धेत देखील एकूण १८ खेळांचे आयोजन करण्यात येईल. ज्युडो ऐवजी बास्केटबॉल खेळाला प्राधान्य देण्यात येत आहे. कंसात दिलेला आकडा प्रत्येक खेळातील पदकयोग्य स्पर्धा दर्शवतो.


बाह्य दुवे

[संपादन]